संदर्भ (Context) हाच सत्ताधीश आहे.

नमस्कार ! तुम्ही एका अतिशय मजेदार प्रयोगात भाग घ्यावा अशी माझी इच्छा आहे. त्याची सुरुवात करण्यासाठी दोन अपूर्ण वाक्ये आहेत - (अ) " सर्व…आहेत. " आणि (ब) " सर्व...कडे...आहे. " पहिल्यांदा, तुम्ही दोन्ही वाक्यांच्या पहिल्या गाळलेल्या जागा एखाद्या अनेकवचनी नामाने भरू शकता. त्यानंतर, तुम्ही दोन्ही वाक्यांच्या दुसऱ्या गाळलेल्या जागेमध्ये (अ साठी) एखादे विशेषण आणि (ब साठी) एखादे क्रियापद आणि अनेकवचनी नाम किंवा विशेषण भरू शकता. मला खात्री आहे की तुमच्या मनात गाळलेल्या जागा भरण्यासाठी नक्कीच काहीतरी आहे जसे की " सर्व लोकांकडे कार आहे ". त्याचप्रमाणे, तुम्हाला हवे असलेले नाम, क्रियापद आणि विशेषण गाळलेल्या जागेमध्ये भरण्याकरिता " लोक...आहेत ", " लोक नेहमी..." किंवा " प्रत्येकजण..." अशी वाक्ये आहेत.

अशी विधाने करणे किंवा रचणे याला अति-सामान्यकरण (Over-generalisation) असे म्हणतात. कोणत्याही विशिष्ट संदर्भाशिवाय एक व्यापक गृहीत रचणे हा सर्वात छोटा बौद्धिक पर्यायी मार्ग (Mental shortcut) आहे. दुसऱ्या शब्दांत बोलायचे झाले तर, अति-सामान्यकरण हि एक बौद्धिक फेरफार आहे जी एखादे गृहितक किंवा निष्कर्षातून आधारभूत संदर्भ किंवा लपलेली जटिलता काढून टाकते. हे निर्विवादपणे सत्य आहे की कोणतीही घटना घडण्यामागे किंवा एखादी गोष्ट अस्तित्वात असल्यामागची स्थिती, कारण, अवस्था, व्यवस्था, संयोजन, इतिहास, सापेक्षता, अवलंबित्व, सहसंबंध, गुणोत्तर किंवा परिस्थिती पूर्णपणे समजून घेण्यासाठी किंवा त्याचे विश्लेषण करण्यासाठी वेळ, शक्ती, संयम आणि इतरांनी दिलेली माहिती देखील आवश्यक आहे.

अति-सामान्यकरण करणारी विधाने, मते, दावे आणि हवाले हे निश्चितपणे संभाषण हलके, अनौपचारिक आणि सरोज ठेवण्यास मदत करतात. तरी देखील, जर लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला तर ते अनेक गंभीर समस्यांना कारणीभूत ठरू शकतात कारण अनेकांना असे करणे आवडते. तुम्ही जर कोणत्याही क्षेत्रातील एखादे विद्वान, तज्ञ किंवा अनुभवी व्यक्ती असाल तर तुम्ही तुमची अति-सामान्यकरण करणारी विधाने, मते आणि दावे लोकांची सहज दिशाभूल करू शकतात. जे तुमच्या कौशल्यावर विश्वास ठेवतात त्यांच्या धारणा, मते, धोरणं आणि/किंवा निर्णय बिघडू शकतात किंवा बिघडतात.

संदर्भ: ज्याच्याबद्दल बरेचसे लोक बोलणंच टाळतात

अति-सामान्यकरण करणारी विधाने, मते, दावे आणि हवाले जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात अस्तित्वात आहेत. दुर्दैवाने काही अत्यंत प्रतिष्ठित आणि जबाबदार शास्त्रज्ञांनीही काही महत्त्वाच्या बाबींचे अति-सामान्यकरण केले असावे. पृथ्वीच्या इतिहासातील लाखो वर्षांपूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती खूप वेगळी असून सुद्धा मी एका प्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेत्याला शास्त्रज्ञाला वातावरणात असलेल्या कार्बन डायऑक्साईड (CO2) वायूच्या प्रमाणाचे अति-सामान्यकरण केलेले पाहिले आहे. त्यांनी त्याच्या एका साध्या समीकरणातून जैविक परिस्थिती पूर्णपणे वगळली. हे अतिशय घातक किंवा खासकरून अवैज्ञानिक नाही का ?

देहबोलीच्या क्षेत्रात अति-सामान्यकरण करणारी विधाने, मते, दावे आणि हवाले वाचकांचे लक्ष वेधून घेतात. त्यापैकी काही ह्याप्रमाणे - " मूलभूत भावनिक हावभाव जगभरात सारखेच आहेत ", " मानवी संभाषणाचा ९३ % हिस्सा हा अशाब्दिक असतो ", " लोक दिवसातून...वेळा खोटे बोलतात " (ह्या गाळलेल्या जागेमध्ये तुम्ही ऐकलेला आकडा टाकू शकता). अलीकडेच, मी एक लेख वाचला ज्यामध्ये असे नमूद केले आहे की एका जगप्रसिद्ध देहबोली तज्ञाने असा जाहीर दावा केला आहे, " सूक्ष्म-हावभाव (Micro-expressions) असे काहीच असत नाही ! " त्यांच्यामध्ये चेहऱ्यावरील सूक्ष्म-हावभावांचाही समावेश आहे का ?

केवळ संदर्भच देहबोलीच्या संकेतांना अर्थ देतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर, वेगवेगळ्या देहबोलीतील संकेतांचा एकत्रित अर्थ त्यांना ज्या स्थितीत, प्रसंगात किंवा परिस्थितीमध्ये ते पाहिले, ओळखले किंवा पकडले गेले आहे ती समजून घेतल्यानंतर किंवा तिचे विश्लेषण केल्यानंतरच अचूकपणे शोधला किंवा काढला जाऊ शकतो. देहबोलीचे संकेत हे संदर्भापासून वेगळे केले जाऊ शकत नाहीत. देहबोलीत संदर्भ हाच एक बिनविरोध, निर्विवाद आणि शाश्वत शासक (किंवा खरा हुकूमशहा) आहे. संदर्भ हाच सत्ताधीश आहे.

संदर्भ समजणे: वेगवेगळे तुकडे एकत्र जोडणे

स्थिती, प्रसंग किंवा परिस्थिती व्यतिरिक्त, देहबोलीचे संकेत देणाऱ्या व्यक्तीची शारीरिक वैशिष्ट्ये (किंवा काही असामान्यता असल्यास), सामाजिक-आर्थिक स्तर, भौगोलिक मूळ, पेशा/व्यवसाय, व्यक्तिमत्व, चारित्र्य, वांशिकता, शिक्षण, इतिहास, संस्कृती, लिंग आणि वय यांचा संदर्भामध्ये समावेश केला जाऊ शकतो. तरी देखील, संदर्भाला ह्यापेक्षा देखील अतिशय व्यापक आणि सखोल पातळीवर नेले जाऊ शकते.

Comments