![]() |
| "अरे, काय चाललंय तरी काय ?" |
" ह्या जगाचा ताबा मनोविकृत (Psychopath) व्यक्तींनी, महा-अहंकारी व्यक्तींनी, दुष्ट परग्रहवासीयांनी किंवा चक्क अमानवी शक्तींनी घेतला आहे का ? एखादा असुर गुपचूपपणे मानवी मनांशी खेळ खेळत आहे का ? सध्या नेमकं कोण या सर्व जगाची सूत्रं हलवत आहे ? "
जवळपास संपूर्ण जगातील सध्याची परिस्थिती पाहताना, तुम्ही अगदी हेच प्रश्न तुमच्या मनात आल्याशिवाय किंवा तुम्ही उघडपणे विचारल्यावाचून राहणार नाही. जरा तुमच्या घाईगडबडीच्या दिनचर्येतून निदान थोडा वेळ काढून आणि बारकाईने विश्लेषण करून पहा की " पर्यावरण संरक्षण ", संसाधनांचे वाटप, (जागतिक-)राजकारण, सहकार्य, विकास/सुधारणा, तंत्रज्ञान, विचारसरणी, धर्म/जात आणि अर्थव्यवस्था ह्या बाबतीत किंवा यांच्या नावाखाली " लोकांपेक्षा फायद्याला महत्व ", आत्मविश्वास, स्वकेंद्रितपणा, अहंकारीवृत्ती, बेजबाबदारपणा, अतिरेकीपणा, बेदरकारपणा, महत्वाकांक्षा, कट्टरपणा, अविचार, फसवणूक, चिथावण्या, शोषण, लूटमार, ढोंगीपणा किंवा फसवणूक यांचे प्रमाण नेमकं किती आहे ते ! हवामान, समाज, जीवनशैली, नातेसंबंध आणि माणसांचे वागणे या बाबतीत अनेक लोकांना आजचे जग हे त्या जगापेक्षा (काळापेक्षा) नक्की बरंच वेगळे आहे असं जाणवेल ज्या जगात (काळात) त्यांचा जन्म झाला होता, मग भले तो अगदी काही दशकांपूर्वी झाला असेना का ! बाकीच्या लोकांचे राहू दे ! तुमचं काय ? तुम्हाला आताचे जग कसं वाटतंय ?
हेच एक मुख्य कारण असू शकते कि ज्यामुळे आज जगभरातील करोडो लोकांमध्ये कदाचित पूर्वीपेक्षा कधी नव्हे तितक्या प्रमाणात घाई, भीती, राग, उदासपणा, तणाव, द्वेष/तिरस्कार, भीती, चिंता, हताशा, निस्तेजपणा, विसरभोळेपणा, निद्रानाश, व्यसनाधीनता, निरर्थकता, भोगीवृत्ती, पलायनवाद, असुरक्षितता, नीरसता, एकटेपणा, असहनशीपणा, विचलितपणा, भ्रमनिरास, अनास्था, अनिश्चितता, अधीरता, असुरक्षिपणा, असंवेदनशीलता, निरुत्साह, दिशाहीनता, असहाय्यता, निराशावाद, उद्देशहीनता, चंगळवाद, भयाण भविष्याची भीती, " काहीच अर्थ नसल्याची " भावना, फसवणुक झाल्याची भावना, जगण्याबद्दलची भीती आणि/किंवा सर्वात महत्त्वाचे म्हणजे - लोप पावत जाणारा विश्वास या गोष्टींचा फैलाव किंवा ह्या गोष्टींमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. तुम्ही त्या लोकांमध्ये तर नाही का ? नक्की का ? बघा ! एकदा शांतपणे बसा आणि स्वतःला गंभीरपणे विचारा. बरं, लोकांमध्ये नेमका विश्वास तरी कशाकशावरचा उडत चाललाय ? तुम्ही जे नाव सांगाल त्यावरचा !
जर तुमचा असा ठाम विश्वास असेल की मनोविकृत (Psychopath) व्यक्तीमध्ये मानवी भावनांचा पूर्णपणे अभाव असतो तर तुम्ही पूर्णपणे चुकत आहात (माफ करा !). तथाकथित " मानवी भावनांचा अभाव " हे एका सामान्य दिसणाऱ्या व्यक्तीला अनैतिक, निष्काळजी, अविचारी, नीतिमत्ताहीन, पश्चातापहीन, आत्मपूजक, बेजबाबदार, खोटारडी, अत्याचारी, केवळ आपलाच फायदा बघणारी आणि इतरांचे शोषण करणारे बांडगूळ बनवत नाही. खरं तर, मनोविकृत व्यक्तीमध्ये मानवी भावना असतात, पण त्यांना इतरांच्या भावना, संवेदना आणि दुःखाची पर्वा नसते. त्यांच्यामध्ये इतर माणसांच्या किंवा अगदी त्यांच्या जवळच्या व्यक्तींबद्दलही समानुभूती (Empathy) खूप कमी असते किंवा नसतेच. तुम्ही ' समानुभूती ' हा शब्द पहिल्यांदाच वाचत आहात का ? ' समानुभूती ' किंवा सम-अनुभूती म्हणजे समान किंवा एकसारखे बनून राहिल्याची स्थिती !
आतापर्यंत तुम्ही नक्कीच आणखी एक शब्द अनेकदा वाचला असेल, ऐकला असेल किंवा कदाचित वापरलाही असेल. तो शब्द म्हणजे ‘ सहानुभूती ’ (Sympathy)! या शब्दासोबतच, ‘ सहानुभूती दर्शवणे ’ (Sympathizing) आणि ‘ सहानुभूतीदार ’ (Sympathizer) हे शब्दही तुम्ही आतापर्यंत अनेकदा वाचले, ऐकले किंवा वापरले असतील. तुम्ही कदाचित इतरांबद्दल तुमची सहानुभूती व्यक्त केली असेल किंवा तुम्ही स्वतः कोणाचे तरी सहानुभूतीदार बनला असाल. तथापि, बहुतेक लोक ‘ सहानुभूती ’ (Sympathy) आणि ‘ समानुभूती ’ (Empathy) या दोन शब्दांमध्ये गोंधळ करतात. जरी या दोन्ही शब्दांचा उच्चार जरी एकसारखा वाटलं असला तरी त्यांचे अर्थ मात्र एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. त्यामुळे या दोन्ही शब्दांबद्दल अधिक स्पष्ट समज होणे आवश्यक आहे.
सहानुभूती म्हणजे समोरची व्यक्ती नेमकी कोणत्या परिस्थितीतून जात आहे, तिला काय वाटत आहे किंवा ती काय अनुभवत आहे हे समजून घेण्याचा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ! याउलट, समानुभूती म्हणजे तीच भावना स्वतःच्या आत अनुभवण्याचा एक खरा पण जाणिवेच्यापलीकडचा अनुभव आहे. सहानुभूतीच्या उलट समानुभूती म्हणजे जणू दुसऱ्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून त्याला खरोखर कसे वाटते हे अनुभवण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. एक व्यक्ती जी संकटात, धोक्यात किंवा वेदनेत आहे अशा व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये दुसऱ्या व्यक्तीची देहबोली (चेहऱ्यावरील हावभाव आणि शरीराची ढब/आसन) आणि आवाजाचा सूर लगेच बदलतो. तुमच्या बाबतीत असे कधीच घडत नाही का ? आठवण्याचा प्रयत्न करा !
एकीकडे समानुभूती हा एक खरा आणि आपसूक अनुभव आहे. आपल्या आजूबाजूचे लोक आनंदी असताना आपल्याला आनंद होतो आणि जेव्हा ते दुःखी, उदास, रडत असतात, पीडित किंवा निराश असतात तेव्हा आपल्यालाही दुःख होते. त्याचप्रमाणे, जेव्हा इतर धोक्यात असतात तेव्हा आपल्यालाही भीती वाटते आणि जेव्हा इतरांचा छळ, शोषण किंवा त्यांना शिक्षा होत असते तेव्हा आपल्यालाही ही राग येतो. समानुभूतीचा अनुभव पूर्णपणे आपसूक असतो. तसेच, समानुभूतीमुळे लगेच शरीरात आंतरिक आणि रासायनिक बदल होतात. म्हणूनच समानुभूतीची अभिव्यक्ती ही शारीरिक, वर्तनात्मक आणि अशाब्दिक असते.
दुसरीकडे, सहानुभूती ही एक अधिक जाणिवपूर्वक केली जाणारी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये दुसरी व्यक्ती सध्या कोणत्या परिस्थितीतून जात असेल किंवा भूतकाळात गेली असेल याची कल्पना करण्याचा, ते समजून घेण्याचा किंवा त्याचे दृश्य डोळ्यासमोर उभे करण्याचा प्रयत्न केला जातो. सहानुभूती शब्दांद्वारे व्यक्त केली जाते. विशेषतः, ती सहमती, अनुमोदन/पाठबळ, सांत्वन किंवा समर्थनाच्या स्वरूपात असू शकते. परंतु आपसूक जाणवणारा तोच आंतरिक त्रास किंवा अस्वस्थता यात अनुभवली जात नाही. म्हणून सहानुभूतीची नक्कल केली जाऊ शकते पण समानुभूतीची नक्कल करता येत नाही !
आपल्या आवेगांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आपल्याला सुसंस्कृत बनवते पण समानुभूतीपूर्वक वागल्याने आपण खऱ्या अर्थाने समाजशील बनतो. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काय वाटत असेल, ती कोणत्या परिस्थितीतून जात असेल किंवा गेली असेल याचा आंतरिक अनुभव घेते तेव्हा त्या दोन व्यक्ती अक्षरशः ' एकच ' होऊन जातात. इतकेच नाही तर पहिली व्यक्ती संकटात, धोक्यात किंवा वेदनेत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला अशाब्दिकपणे आणि शारीरिकरित्या मदत करू शकते, दिलासा देऊ शकते, वाचवू शकते, संरक्षण देऊ शकते किंवा तिच्यासाठी लढूही शकते.
सहानुभूती नव्हे तर समानुभूती हाच मानवतेचा, नीतिमत्तेचा आणि नैतिकतेचा खरा पाया आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर दुसऱ्याबद्दल दयाभाव, नियमबद्धपणा, जबाबदारपणा, संवेदनशीलपणा, खरेपणा, नैतिकता आणि एकमेकांची काळजी घेणारे वागणे. एकमेकांसोबत मानवीय, नैतिक आणि नियमबद्ध वागण्यामध्ये झालेल्या घसरणीबद्दल जी आज जगभरात चाललेली ओरड आहे ती मुळातच समानुभूती लोप पावत चालल्याचा एक स्पष्ट संकेत आहे. असं वाटायला लागलंय की लाखो वर्षांपासून आपल्याला एकमेकांसोबत राहण्यास आणि सामाजिक सलोखा राखण्यास मदत करणारा एक अत्यावश्यक गुण म्हणजेच समानुभूती दुर्दैवाने लोप पावत चालला आहे.
' समानुभूती ' ह्या शब्दाकरिता एक योग्य आणि पर्यायी मराठी शब्द म्हणजे ' कळवळ ' (किंवा कळवळा)! एखादा व्यक्ती दुःखात, संकटात किंवा धोक्यात आहे असे जाणवल्यानंतर लगेचच आपसूकपणे आपल्या आत काहीतरी हलल्यासारखे, ढवळल्यासारखे, गलबलल्यासारखे किंवा काळजात धस्स झाल्यासारखे होते तीच मेंदूची प्रतिक्रिया किंवा मानसिक स्थिती म्हणजे समानुभूती किंवा कळकळ. कळवळ्याशिवाय दुसऱ्याला दया दाखवायची, त्याची मदत करायची, त्यासाठी धावून जाण्याची, त्यासाठी लढण्याची, त्याला आणखीन त्रास/दुःख न देण्याची किंवा निदान हलवून जागं करायची प्रेरणा तरी कशी येणार ? बरोबर आहे ना ?
[ ' राखीव ' समानुभूती : कोणत्याही (सामान्य) माणसाला इतर प्रत्येक माणसाबद्दल समानुभूती (Empathy) असणे ही अत्यंत नैसर्गिक, उपजत, सहजस्फूर्त किंवा अगदी आध्यात्मिक बाब आहे. असे असून देखील, (भू-)राजकीय महत्वाकांक्षा, कट्टर विचारसरणी किंवा जमातवाद (Tribalism) आपल्या अनुयायांना, समर्थकांना किंवा सदस्यांना पद्धतशीरपणे फसवण्याचा, मुद्दामून प्रवृत्त करण्याचा किंवा त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांची समानुभूतीपूर्ण बांधिलकी, वागणूक, योगदान, धडपड किंवा कृती केवळ त्याच चळवळीचे, विचारसरणीचे किंवा जमातीचे इतर अनुयायी, समर्थक किंवा सदस्य यांच्यापुरतीच मर्यादित किंवा ' राखीव ' राहील. ]

" प्रत्येक मनोविकृत (Psychopath) व्यक्ती ही आत्मपूजक (Narcissist) असते परंतु प्रत्येक आत्मपूजक व्यक्ती ही मनोविकृत नसते."
चिकित्सीय मानसशास्त्रज्ञ डॉ. रामणी दुर्वासुला
( आत्मपूजक व्यक्तिमत्वावरील जगातील अग्रगण्य तज्ज्ञ )

| समानुभूती हा एक अत्यंत महत्त्वाचा समाजशील गुण आहे. (छायाचित्र सौजन्य: अमेरिकन मानसशास्त्र संघटना) |
एकीकडे समानुभूती हा एक खरा आणि आपसूक अनुभव आहे. आपल्या आजूबाजूचे लोक आनंदी असताना आपल्याला आनंद होतो आणि जेव्हा ते दुःखी, उदास, रडत असतात, पीडित किंवा निराश असतात तेव्हा आपल्यालाही दुःख होते. त्याचप्रमाणे, जेव्हा इतर धोक्यात असतात तेव्हा आपल्यालाही भीती वाटते आणि जेव्हा इतरांचा छळ, शोषण किंवा त्यांना शिक्षा होत असते तेव्हा आपल्यालाही ही राग येतो. समानुभूतीचा अनुभव पूर्णपणे आपसूक असतो. तसेच, समानुभूतीमुळे लगेच शरीरात आंतरिक आणि रासायनिक बदल होतात. म्हणूनच समानुभूतीची अभिव्यक्ती ही शारीरिक, वर्तनात्मक आणि अशाब्दिक असते.
दुसरीकडे, सहानुभूती ही एक अधिक जाणिवपूर्वक केली जाणारी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये दुसरी व्यक्ती सध्या कोणत्या परिस्थितीतून जात असेल किंवा भूतकाळात गेली असेल याची कल्पना करण्याचा, ते समजून घेण्याचा किंवा त्याचे दृश्य डोळ्यासमोर उभे करण्याचा प्रयत्न केला जातो. सहानुभूती शब्दांद्वारे व्यक्त केली जाते. विशेषतः, ती सहमती, अनुमोदन/पाठबळ, सांत्वन किंवा समर्थनाच्या स्वरूपात असू शकते. परंतु आपसूक जाणवणारा तोच आंतरिक त्रास किंवा अस्वस्थता यात अनुभवली जात नाही. म्हणून सहानुभूतीची नक्कल केली जाऊ शकते पण समानुभूतीची नक्कल करता येत नाही !
आपल्या आवेगांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आपल्याला सुसंस्कृत बनवते पण समानुभूतीपूर्वक वागल्याने आपण खऱ्या अर्थाने समाजशील बनतो. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काय वाटत असेल, ती कोणत्या परिस्थितीतून जात असेल किंवा गेली असेल याचा आंतरिक अनुभव घेते तेव्हा त्या दोन व्यक्ती अक्षरशः ' एकच ' होऊन जातात. इतकेच नाही तर पहिली व्यक्ती संकटात, धोक्यात किंवा वेदनेत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला अशाब्दिकपणे आणि शारीरिकरित्या मदत करू शकते, दिलासा देऊ शकते, वाचवू शकते, संरक्षण देऊ शकते किंवा तिच्यासाठी लढूही शकते.
" आपल्या आवेगांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आपल्याला सुसंस्कृत बनवते पण समानुभूतीपूर्वक वागल्याने आपण खऱ्या अर्थाने समाजशील बनतो. "
सहानुभूती नव्हे तर समानुभूती हाच मानवतेचा, नीतिमत्तेचा आणि नैतिकतेचा खरा पाया आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर दुसऱ्याबद्दल दयाभाव, नियमबद्धपणा, जबाबदारपणा, संवेदनशीलपणा, खरेपणा, नैतिकता आणि एकमेकांची काळजी घेणारे वागणे. एकमेकांसोबत मानवीय, नैतिक आणि नियमबद्ध वागण्यामध्ये झालेल्या घसरणीबद्दल जी आज जगभरात चाललेली ओरड आहे ती मुळातच समानुभूती लोप पावत चालल्याचा एक स्पष्ट संकेत आहे. असं वाटायला लागलंय की लाखो वर्षांपासून आपल्याला एकमेकांसोबत राहण्यास आणि सामाजिक सलोखा राखण्यास मदत करणारा एक अत्यावश्यक गुण म्हणजेच समानुभूती दुर्दैवाने लोप पावत चालला आहे.
' समानुभूती ' ह्या शब्दाकरिता एक योग्य आणि पर्यायी मराठी शब्द म्हणजे ' कळवळ ' (किंवा कळवळा)! एखादा व्यक्ती दुःखात, संकटात किंवा धोक्यात आहे असे जाणवल्यानंतर लगेचच आपसूकपणे आपल्या आत काहीतरी हलल्यासारखे, ढवळल्यासारखे, गलबलल्यासारखे किंवा काळजात धस्स झाल्यासारखे होते तीच मेंदूची प्रतिक्रिया किंवा मानसिक स्थिती म्हणजे समानुभूती किंवा कळकळ. कळवळ्याशिवाय दुसऱ्याला दया दाखवायची, त्याची मदत करायची, त्यासाठी धावून जाण्याची, त्यासाठी लढण्याची, त्याला आणखीन त्रास/दुःख न देण्याची किंवा निदान हलवून जागं करायची प्रेरणा तरी कशी येणार ? बरोबर आहे ना ?
[ ' राखीव ' समानुभूती : कोणत्याही (सामान्य) माणसाला इतर प्रत्येक माणसाबद्दल समानुभूती (Empathy) असणे ही अत्यंत नैसर्गिक, उपजत, सहजस्फूर्त किंवा अगदी आध्यात्मिक बाब आहे. असे असून देखील, (भू-)राजकीय महत्वाकांक्षा, कट्टर विचारसरणी किंवा जमातवाद (Tribalism) आपल्या अनुयायांना, समर्थकांना किंवा सदस्यांना पद्धतशीरपणे फसवण्याचा, मुद्दामून प्रवृत्त करण्याचा किंवा त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांची समानुभूतीपूर्ण बांधिलकी, वागणूक, योगदान, धडपड किंवा कृती केवळ त्याच चळवळीचे, विचारसरणीचे किंवा जमातीचे इतर अनुयायी, समर्थक किंवा सदस्य यांच्यापुरतीच मर्यादित किंवा ' राखीव ' राहील. ]

Comments
Post a Comment